Fact Check : सध्या भारतीय रेल्वेत बंपर भरती जाहिरातीची जोरदार चर्चा सुरु आहे. या भरतीसाठी रेल्वेने अधिसूचना जारी केली असल्याची बातमी पण काही माध्यमांवर आली आहे. भारतीय रेल्वेने सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या 4660 पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. असे या जाहिरातीत म्हटले होते. मात्र आता भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून ते नाकारण्यात आले आहे.
रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आरपीएफसाठी भरतीच्या मोहिमेची अधिकृत सूचना लवकरच जाहीर केली जाईल. पण अधिसूचना कोणत्या तारखेला प्रकाशित होईल याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा बनावट नोटिफिकेशनपासून सावध राहण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.
Stay on track towards your dreams by avoiding scams. Rely solely on official sources for trustworthy information on railway job opportunities. #StayProtected #PIBFactCheck https://t.co/qGbG7jo59z pic.twitter.com/F9oOvJXbNR
— RPF INDIA (@RPF_INDIA) February 27, 2024
PIB या शासकीय वृत्त संस्थेने फॅक्टचेक दरम्यान ४६६० कॉन्स्टेबल आणि एसआय पदांच्या भरती संदर्भात व्हायरल भरतीची नोटीस खोटी असल्याचे समोर आले आहे. अधिकृत संकेतस्थळावर ट्विटर करत पीआयबीने याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाद्वारे अशी कोणीतीही अधिकृत सुचना जाहीर करण्यात आलेली नाही.
पीआयबीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, वरील सूचना खोटी आहे. रेल्वे संरक्षण दलात सब-इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या भरतीबाबत रेल्वे मंत्रालयाच्या नावाने जारी केलेली खोटी नोटीस सोशल मीडियावर फिरत आहे. रेल्वे मंत्रालयाद्वारे (@RailMinIndia)द्वारे अशी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. तुमची वैयक्तिक/आर्थिक माहिती कधीही शेअर करू नका.”