Sunday, December 22, 2024
Homeराज्यफेसलेस फेसबुकचा फेस १५ जूनला वाचकांसमोर येणार - अभिनेत्री छाया कदम यांच्या...

फेसलेस फेसबुकचा फेस १५ जूनला वाचकांसमोर येणार – अभिनेत्री छाया कदम यांच्या हस्ते प्रकाशन…

सांगली – ज्योती मोरे

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुणे प्रकाशित मारुती शिरतोडे लिखित “फेसलेस फेसबुक” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दि. 15 जून 2023 ला विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली येथे सायंकाळी 4 वाजता पार पडणार आहे. आपल्या आजूबाजूला खूप मोठं काम केलेली, आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेली बरीच माणसं असतात.

पण समाजाकडून अशी माणसं बऱ्याचदा दुर्लक्षिली जातात. हि माणसं आपापल्या क्षेत्रातले खरे कोहिनुर असतात. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित फेसलेस फेसबुक हे पुस्तक आहे. समाजातील उपेक्षित 27 कर्तृत्ववान माणसांना समाजासमोर आणण्यासाठी या पुस्तकाचं लेखन केलं आहे.

या पुस्तकाचं प्रकाशन सैराट, फॅन्ड्री, गंगुबाई काठीयावाडी, अंधाधून यासारख्या सिनेमात भूमिका केलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राक्षसांचा राजा रावण या बेस्ट सेलर कादंबरीचे लेखक शरद तांदळे,

आटपाडी नाईट्स सिनेमाचे दिग्दर्शक नितीन सुपेकर, ख्वाडा आणि बबन या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव गुरव, लेखक व पत्रकार संजय आवटे, सामिकु महानगरपालिकेचे महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अरुण आण्णा लाड असणार आहेत.

अशी माहिती लेखक मारुती शिरतोडे यांनी दिली. पत्रकार बैठकीवेळी विशाल शिरतोडे, कुलदीप देवकुळे, विक्रम शिरतोडे, शेखर रणखांबे, अक्षय शिंदे, विलास साठे आदी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: