Monday, December 23, 2024
Homeराज्यग्रामीण भागातील गुंठेवारी प्रस्‍ताव स्विकारण्‍यास ३१ मार्च २०२३ पर्यत मुदतवाढ...

ग्रामीण भागातील गुंठेवारी प्रस्‍ताव स्विकारण्‍यास ३१ मार्च २०२३ पर्यत मुदतवाढ…

नांदेड – महेंद्र गायकवाड

गुंठेवारीचे बरेच प्रस्‍ताव दाखल करावयाचे शिल्‍लक असल्‍याने ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्‍ताव दाखल करण्‍यास आता 31 मार्च 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली.

त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगररचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडे नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्यामार्फत छाननी शुल्‍कासह प्रस्‍ताव दाखल करण्यास 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदत देण्‍यात आली होती. त्यास आता 31 मार्च 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: