अकोला – संतोषकुमार गवई
अकोला – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,. मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, विद्यावेतन आदींसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यासाठी दि. 15 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरले नसतील त्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in वर भरून घ्यावेत, तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनीही विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत भरले जातील याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. तसे झाल्यास ती जबाबदारी महाविद्यालयाची असेल, असे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.