खामगांव – हेमंत जाधव
भारतीय जनता पक्षाचे खामगाव जिल्ह्याचे अधिवेशन 2 ऑगस्ट शुक्रवार रोजी शेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय मुख्य अधिवेशन नुकतेच भारत देशाचे गृहमंत्री ना .अमितजी शहा यांचे प्रमुख उपस्थितीत 21 जुलै रोजी पुणे येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडले. त्यानंतर आता संत नगरी शेगाव येथील पांडुरंग कृपा मंगल कार्यालयात भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांचे खामगाव जिल्हास्तरीय भव्य विस्तारित अधिवेशन (बैठक) आयोजित करण्यात आली आहे.
2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनाला प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ. रणधीरजी सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष मा. आ. चैनसुखजी संचेती, माजी मंत्री तथा आ. डॉ. संजयजी कुटे, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. अँड. आकाशदादा फुंडकर हे राहणार आहे. या अधिवेशनासाठी खामगाव जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद, व मलकापूर मतदारसंघातील भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, सदस्य, जिल्हा पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, युवा मोर्चा ,
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी ,जिल्हा व मंडळ पदाधिकारी, तसेच विविध मोर्चा, प्रकोष्ट, सेल पदाधिकारी, विधानसभा निवडणूक प्रमुख, मंडळ अध्यक्ष, विस्तारक, सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, शहर मंडळ अध्यक्ष, सोशल मीडिया व मीडिया सेलचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, डॉ. गणेश दातीर, सुषमाताई शेगोकार यांनी केले आहे.