Monday, December 23, 2024
Homeराज्यडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेकरिता मुदत वाढ द्या अन्यथा आंदोलनाचा विद्यार्थी नेते...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेकरिता मुदत वाढ द्या अन्यथा आंदोलनाचा विद्यार्थी नेते आकाश हिवराळे यांचा ईशारा…

पातूर – निशांत गवई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जाती च्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न झाल्यास अर्थसहाय्य म्हणून राबविण्यात येते.परंतु समाजकल्याण कार्यालय अकोला मार्फ़त नवीन अर्ज भरणे व नूतनीकरण अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन विद्यार्थी योजनेपासून वंचित राहतील याची दखल घेत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा समाजकल्याण आयुक्त यांना निवेदन देऊन तात्काळ मुदत वाढविण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे,पवन तायडे, वैभव अवचार,वैभव मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: