अकोला – अमोल साबळे
पूर्वी च्या काळात नदीच्या काठावर वास्तव्य असणाऱ्या गावात पावसाच्या दिवसात नदी पार करण्यासाठी रस्ते आणि पुल नसल्यामुळे गावातील घराघरात भोपळयापासुन तयार केलेल्या सांगळ असत हया सांगळी आधुनिक आणि प्रगत युगात नामषेश होण्याच्या मार्गावर आहेत.
आजपासून जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापूर्वी गावागावात पक्क्या रस्त्याचे जाळे नव्हते नदीच्या तीरावर ग्रामीण भागात पुल नव्हते अशा काळात जर पावसाळ्यात एका गावावरुन दुस-या गावात नदी पार करून जर जाण्याचा प्रसंग आला तर प्रत्येक घरात भोपळया पासून बनविलेले सांगळ नावाचे साधन उपलब्ध असायचे देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याला जोडण्याची महत्वपूर्ण योजना सुरू गाव तेथे रस्ता पोहचविण्याचे काम केले रस्त्याचे काम करताना पावसाळ्यात वाहतूक खंडित होऊ नये म्हणून प्रत्येक नदीवर पुलाचे बांधकाम केले असल्यामुळे लहानसहान पुरात रस्ता बंद पडणे देखील बंद झाले.
पंचवीस तीस वर्षापूर्वीचा काळ असा होता की प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची शेती नदीच्या दुस-या तीरावर होती या शेतीची पेरणी करणे पेरणीनंतर पिकाची आंतरमशागतीची कामे करण्यासाठी नदी पार करणे हि बाब नित्याची होती त्याकाळी लोक या तीरावरून दुस-या तीरावर जाण्यासाठी परंपरागत साधन म्हणजे भोपळयापासुन बनविलेली सांगळ चा वापर करत होते आता काळाच्या ओघात हि सांगळ नामषेश झाली आहे.
आपल्या गावाच्या पैलतीरावर असलेल्या नेर ( धामणा) गावात जर कुणी जास्त आजारी असले तर मी स्वतः सांगळ घेऊन नेर येथे सांगळ या परंपरागत साधनाने नदी पार करून औषधोपचार करत होतो आता ते साधन आधुनिक युगात नामषेश झाले आहे. डाॅ एस डब्ल्यू वेते ( बोरगाव वैराळे)