Wednesday, December 25, 2024
Homeराज्यडिजिटल मिडिया परिषदेची कार्यकारिणी जाहीर - सांगली जिल्हाध्यक्षपदी तानाजीराजे जाधव...

डिजिटल मिडिया परिषदेची कार्यकारिणी जाहीर – सांगली जिल्हाध्यक्षपदी तानाजीराजे जाधव…

सांगली – ज्योती मोरे

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी तानाजीराजे जाधव यांची निवड करण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी डिजिटल परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.

तानाजीराजे जाधव यांच्यासह कार्याध्यक्ष शहर जिल्हा अभिजित शिंदे, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रसाद पिसाळ (विटा), शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुर्यवंशी, सलीम नदाफ, ग्रामीण उपाध्यक्ष दिनराज वाघमारे (जत), सरचिटणीस मोहन राजमाने, खजिनदार गितांजली पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी किशोर पुजारी (आटपाडी), महेश सानप (मिरज), पांडुरंग कोळी (जत), मिलिंद पोळ (तासगाव), अरूण पाटील (सांगली) यांचा समावेश करण्यात आला. सांगली शहर अध्यक्षपदी सुधाकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी ज्योती मोरे यांची निवड करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार संपत बर्गे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी (बाप्पा), चंद्रकांत क्षिरसागर, मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, बलराज पवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: