Thursday, September 19, 2024
Homeराज्यपातूर घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ, इसमाची गळफास घेऊन आत्महत्या...

पातूर घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ, इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

पातूर – निशांत गवई

अकोला – वाशिम रोडवर पातूर घाटात रस्त्याच्या कडेला एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. आज दि.22 मे 2023 रोजी पातूर पासून वाशीमकडे जवळपास 3 किमी अंतरावर असलेल्या पातूर घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला एक इसम गळफास घेऊन कुजलेल्या अवस्थेत आढळून आला,

असता पातूर पोलिसांनी प्राथमिक शोध घेतला असता सदर इसम हा दि. 20/05/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता दुचाकी क्र. एम.एच. 37 क्यू 8278 घेऊन कोणालाही नं सांगता निघून गेला असून तेंव्हापासून बेपत्ता असून त्याचे नातेवाईकांनी तशी तक्रार मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे.

दरम्यान पातूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता मृतकाचे नाव शंकर भगवान घुगे रा.मारसुळ ता.मालेगाव येथील रहिवासी असून पेशाने लाईनमन असल्याचे निष्पन्न झाले.

प्रेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात वास सुटल्यामुळे सदर घटना उघडकीस आली असून यावेळी मृतदेह खाली उतरवून बाहेर आणण्यासाठी दुले खान युसूफ खान,सय्यद जाफर,पप्पू चवरे, मुकेश खोडे यांनी मदत केली.

दरम्यान पातूर पोलिस स्टेशनचे मानकर मेजर,संबोधी इंगळे,वाहनचालक केकन यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: