Saturday, November 23, 2024
Homeराज्यबार्टीद्वारे उत्कृष्ट कार्यशाळेचे आयोजन...

बार्टीद्वारे उत्कृष्ट कार्यशाळेचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

नुकतेच समतादूत व प्रकल्प अधिकारी यांच्या करीता उत्कृष्ट कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटक महासंचालक मा.सुनील वारे यांनी महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींकरीता भरीव कार्य करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.सर्व प्रथम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकारी यांनी समतादूतांनी केलेल्या भरीव सामाजिक कामकाजाचा आढावा पीपीटी द्वारे सादर केला.

समतादूत प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच समतादूतांकरीता वस़ंत हंकारे यांचे प्रेरणादायक व तुफान विनोदी व्याख्यान आयोजित करण्यात आले. योग, विपश्यना,ध्यान साधनेची माहिती सोबतच व्यायाम, कसरत, शारीरिक हालचाली, चुस्ती स्फुर्ती देखील महत्त्वाचे असून सामुहिक उड्या मारत नृत्य केल्याने नवी उर्जा व नवचैतन्य निर्माण होते याचे नृत्यात्मक प्रात्यक्षिक घेण्यात आले.

विभाग प्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी समतादूतांना प्रोत्साहनपर प्रबोधन केले आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या समतादूतांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून बौद्धिक, आर्थिक व सामाजिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही दिली.

रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी सत्कार करण्यात आला.हा सत्कार राजेश राठोड, ओमप्रकाश डोले, दुर्योधन बगमारे व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले यांनी स्विकारला, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे राज्य समन्वयक हेमंत वाघमारे यांनी स्वयंसहाय्यता युवा गटाची यशोगाथा सांगून समतादूतांच्या कार्याचे कौतुक केले. प्रशिक्षणात विविध व्याख्याने, बौद्धिक व शारिरीक कसरतचे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या समतादूतांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.अशा प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण व कार्यशाळा व प्रेरणात्मक व्याख्यान बार्टी द्वारे समतादूतांकरीता प्रथमच आयोजित केल्याचे रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी सांगितले.समतादूत प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अधिकारी नसरीन तांबोळी, विशाखा, तेजस्विनी यांनी अथक परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: