Sunday, December 22, 2024
HomeAutoइव्हियम स्मार्ट मोबिलिटीद्वारे ईव्ही स्कूटरवर सवलतीची घोषणा...

इव्हियम स्मार्ट मोबिलिटीद्वारे ईव्ही स्कूटरवर सवलतीची घोषणा…

लोकप्रिय टू-व्हीलर ईव्ही स्कूटर्स- कॉस्मो, कॉमेट आणि झारवर मिळणार सवलत

इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य असलेल्या इव्हियम स्मार्ट मोबिलिटीने आपल्या तीन सर्वात लोकप्रिय टू-व्हीलर स्कूटर्स: कॉस्मो, कॉमेट आणि झारवर बंपर सवलत जाहीर केली आहे. इव्हियम स्मार्ट मोबिलिटीद्वारे हा, एलिसियम ऑटोमोटिव्ह्जचा संपूर्ण मेड-इन-इंडिया ईव्ही टू-व्हीलर ब्रँड आहे, जो संयुक्त अरब अमिराती-आधारित एमईटीए४ ग्रुपची ऑटो शाखा आहे.

कॉस्मोची एक्स-शोरूम किंमत १,३९,२०० रुपये आहे आणि १२,७०१ रुपयांच्या सणासुदीच्या ऑफरसह, खरेदीदार आता तिला १,२६,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. कॉमेटची एक्स-शोरूम १,८४,९०० रुपये आहे आणि १५,४०१ रुपयांच्या सणासुदीच्या ऑफरसह, ती आता फक्त १,६९,४९९.०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. झारची एक्स-शोरूम किंमत २,०७,७०० रुपये आहे आणि १५,२०१ रुपयांच्या विशेष सवलतीसह, ग्राहक तिला १,९२,४९९.०० रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकतात. ही ऑफर, १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत लागू असेल. ग्राहक, कोणत्याही जवळपासच्या इव्हियम स्मार्ट मोबिलिटी शोरूमला भेट देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात किंवा केवळ ९९९ रुपयांमध्ये कोणतेही मॉडेल, ऑनलाइन बुक करू शकतात.

इव्हियम स्मार्ट मोबिलिटीचे सीबीओ श्री. सलाम मोहम्मद म्हणाले, “आम्ही नुकताच बाजारात प्रवेश केला आहे, परंतु आमच्या फ्लीट ऑफरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. या सणाच्या हंगामात, इव्हियम स्मार्ट मोबिलिटी, या महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सणांच्या उत्सवाचा एक भाग बनू इच्छितो. ईव्हीला जास्त मागणी असल्याने, खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांसाठी या ऑफर्स आणल्या आहेत.

या ऑफरमुळे, आमच्या ग्राहकांना प्रतिष्ठित इव्हियम स्मार्ट मोबिलिटी उत्पादने घरी नेता आल्यामुळे तसेच त्यांच्यामुळे देशाच्या हरित गतिशीलता क्रांतीमध्ये योगदान दिल्या गेल्यामुळे मिळणारा आनंद आणि समाधान देऊन, आमच्या ग्राहकांशी विश्वास दृढ करण्यात आम्हाला मदत होईल.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: