जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात साजरा…
पातूर – निशांत गवई
अकोला जिल्ह्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागात असलेले चतारी गावामध्ये जि. प.प्राथ.डिजिटल शाळेत दि.26 जाने.रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी मंचकावर प्रमुख अतिथी म्हणून चांनीचे ठाणेदार योगेश वाघमारे यांची उपस्थिती लाभली होती.
दरम्यान संस्कृतीचे जतन करत अपयशाने खचून न जाता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळेपर्यंत सातत्याने कार्य करत राहावे. त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणाने देश हिताकरिता सत्कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन योगेश वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक गण यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी निमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरी व झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर जि.प शाळेतील चिमुकल्यांचा मंत्रमुग्ध करून टाकणारा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर चांनीचे ठाणेदार योगेश वाघमारे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वैशाली आखरे, उपाध्यक्ष यशवंत सदार ,सर्व सदस्य गण शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ढोरे सर, त्याचप्रमाणे गावचे पोलीस पाटील विजय सरदार यांची उपस्थिती होती. जि प शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मंत्रमुग्ध करून सोडणारा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील पालकवर्ग ,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थांसह बहुसंख्य महिलांनी हजेरी लावली होती.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भारदस्त कार्यक्रमाने गावकरी भारून गेले होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सदार सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक सदानंद ढोरे सर यांनी केले. नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे जि.प.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सदानंद ढोरे सर, कु.छाया राउत मॅडम, राजेश इंगळे सर, सुनील सदार सर, मनीष खंडारे सर, कु. प्रिया इंगळे मॅडम, संदीप कोल्हे सर , भानुदास तायडे सर या सर्व शिक्षकांचे परिश्रमासह मोलाचे सहकार्य लाभले.