सांगली – ज्योती मोरे
भारतीय जनता पार्टी सांगली विधानसभा क्षेत्रातून 76 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार. मेरी मिट्टी मेरा देश, हर घर तिरंगा, तिरंगा रॅली अभियान अंतर्गत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे नेतृत्वाखाली भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही तिरंगा रॅली सकाळी 11 वाजता राम मंदिर चौक सांगली इथून सुरू होऊन ती स्टेशन रोड मार्गे, मेन रोड, कापड पेठ, हरभट रोड, दत्त मारुती रोड मार्गे शिवतीर्थावर विसर्जित झाली. तसेच मारुती चौकात उभारण्यात आलेल्या 14 ऑगस्ट फाळणी दिवस.
” विभाजन विभिषिका स्मृतिदिन ” भारत देशाच्या झालेल्या दुर्दैवी फाळणी वेळी देशाच्या सीमा भागातील लक्षावधी निष्पाप भारतीय नागरिकांच्यावर झालेले अमानुष हल्ले, कत्तली, महिलांच्या वरील अत्याचार, उसळलेल्या जातीय दंगलीची त्याकाळची दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मारुती चौकामध्ये उभारले होते यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले व नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
यावेळी आ.सुधीरदादा गाडगीळ व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी संपूर्ण सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांनी तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित घरावरती तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले.
या तिरंगा रॅलीमध्ये सुधीर दादा गाडगीळ, माजी आ. दिनकरतात्या पाटील, शेखर इनामदार, पै.पृथ्वीराज भैय्या पवार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रकाश तात्या बिर्जे, अविनाश मोहिते, सुबराव मद्रासी, युवराज बावडेकर, संजय कुलकर्णी, संजय यमगर, विश्वजीत पाटील, राजेंद्र कुंभार, सुरज पवार, रोहित जगदाळे,
नगरसेविका कल्पना कोळेकरउर्मिला बेलवलकर, किरण भोसले, गणपती साळुंखे, बाळासाहेब पाटील दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे उदय मुळे, महेंद्र पाटील, आदी नगरसेवक, सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.