मुंबई: काल शिवसेनेच्या (UBT) शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपसभापतींना 79 पानी पत्र सादर करून एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार पडणार नाही. सरकारला कोणताही धोका नाही.”
आपल्या मताला तर्क जोडत अजित पवार म्हणाले की, 16 आमदार अपात्र ठरले तरी सरकार 288 सदस्यीय विधानसभेत बहुमत गमावणार नाही. कारण २८८ पैकी यदाकदाचित त्या १६ आमदारांचा निकाल काही वेगळा (आमदार अपात्र ठरले) लागला. वेगळा निकाल लागणारच नाही. पण समजा निकाल वेगळा लागला तरी त्या निकालाचा सरकारच्या बहुमतावर कुठलाही परिणाम होणार नाही. २८८ पैकी १६ आमदार अपात्र ठरले तर राहतात २७२ आमदार, मग बहुमताचा आकडा कमी होतो. तेवढं बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा सरकारवर काहीही परिणाम होईल, असं सध्या दिसत नाही.
तर कालच शिवेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवळ आणि विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जलद कारवाईची मागणी करणारे पत्र सुपूर्द केले.