भ्रष्टाचारी कंत्राटाराला पाठिशी घालणाऱ्या मनपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन…
दिलेल्या वाढीव मुदतीत पूर्ण करा अन्यथा माती आणून नाला बुजवुन जनतेसाठी सुरू करू – प्रशांत पवार
नागपूर – शरद नागदेवे.
नागपूर. रामदासपेठेतून महाराजबागकडे जाणाऱ्या मार्गावरील नागनदीच्या पुलाच्या बांधकामाची कालावधी संपुणही बांधकाम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला पाठिशी घालणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात जाब विचारण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) वतीने गुरूवार दि.02.11.2023 रोजी सकाळी 11.30 वाजता भजन, किर्तन करून आंदोलन करण्यात आले.
मागील 2 वर्षापासून नागपुरकर जनतेचे या पुलामुळे हाल होत आहेत, या करीता कोणीही समोर येवून जाब विचारण्याकरीता येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मनपाचे आयुक्त व अधिकारी भ्रष्टाचार करणाऱ्या व्यवस्थेला अधिकाऱ्यांना, कंत्राटदाराला पाठिंबा देत आहेत काय?
31 ऑक्टोबरला मुदत संपल्यानंतरही त्या कंत्राटदाराला 2 महिन्याची मुदत का देण्यात आली? याची चौकशी करण्यात यावी असे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी यावेळी म्हटले. जोपर्यंत आयुक्त किंवा अधिकारी या आंदोलन स्थळी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आल्यावर धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त वराडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.
प्रशांत पवार यांनी वराडे येताच फुल देऊन स्वागत केले आणि जाब विचारले, 31 जानेवारी 2024 पर्यंत आम्ही या पुलाचे बांधकाम पुर्ण करण्याचे आश्वासन वराडे यांनी दिले. या पुलाचे बांधकाम दिलेल्या वेळात पुर्ण झाले नाहीत तर याची सर्वस्वी जबाबदारी सहायक आयुक्त वराडे यांची राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असे प्रशांत पवार यांनी म्हटले.
यावेळी राज्य महिला आयोग सदस्य आभाताई पांडे, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, सामाजिक न्याय विभागचे शहर अध्यक्ष अरविंद ढेंगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खांडेकर, प्रदेश संघटन सचिव सोहेल पटेल, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष संदिप सावरकर, युवक कार्यकारी अध्यक्ष रवि पराते, माजी नगरसेवक राजेश माटे, महासचिव मिलिंद महादेवकर, उपाध्यक्ष जयंत किनकर, निलिकेश कोल्हे,
राजु मिश्रा, युवक काँग्रेसचे नागेश देठमुठे, विद्यार्थी अध्यक्ष विष्वजीत तिवारी, मध्य नागपुर अध्यक्ष भारती गायधने, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष इकबाल अंसारी, विशाल खरे, सोशल मिडिया उपाध्यक्ष निखिल चाफेकर, संजय पाटिल, अनिकेत खोब्रागडे, स्विकार शिंगरू, सुशील शाह, राहुल आमदरे, रितेश सदाशिव, अशोक मिश्रा, सुजल मुन, शेखर बेंडेकर, राहुल इंगळे, पुष्पम धानोरकर, पंकज कावरे व इतर कार्यकर्ते आणि परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.