आज तेलंगणाच्या एका शहरातील हॉटेल मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ओवर चार्ज केल्याने आग लागून 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची आपल्या मनात कदाचित भीती बसली असेल किंवा ज्यांना इलेक्ट्रिक कार पहिल्यांदा खरेदी करण्यापूर्वी मनात अनेक प्रश्न येतात, ज्यामध्ये पहिली गोष्ट येते, ती सुरक्षित आहेत का? जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल परंतु सुरक्षिततेमुळे निर्णय घेऊ शकत नसाल तर आज याबद्दल माहिती देत आहोत.
ईव्ही किती सुरक्षित आहेत
इलेक्ट्रिक कार अतिशय प्रगत पद्धतीने बनवल्या जातात. यामध्ये आयपी रेटिंग दिलेली आहे, जी त्यांच्या सुरक्षेची माहिती देते. त्यांच्या बॅटरीमध्ये संरक्षणाचे अनेक स्तर बसवले जातात, त्यानंतर त्यांची सुरक्षा आणखी वाढते.
पाण्यापासून किती सुरक्षित आहे
ईव्ही बॅटरी चार्ज करताना त्यात विद्युत प्रवाह साठवला जातो. बॅटरीमध्ये करंट गेल्यावरही कार पाण्यात चालत असली तरी ती पूर्णपणे सुरक्षित असते. EVs ला IP रेटिंग दिले जाते आणि भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश कारना IP 67 रेटिंग आहे. IP67 रेटिंग पाणबुड्यांमध्ये देखील वापरली जाते, याचा अर्थ असा आहे की अशा रेटिंगची बॅटरी अत्यंत सुरक्षित आहे. पाणी येण्यापूर्वीच त्यांच्यावरील थर सक्रिय होतात. मुख्य बॅटरी पॅकमध्ये कारच्या इतर भागांपासून स्वतःला इलेक्ट्रिकली अलग ठेवण्याची क्षमता देखील आहे.
चार्जिंग किती सुरक्षित आहे
आणखी एक प्रश्न जो वारंवार मनात येतो तो म्हणजे पावसाळ्यात त्यांना चार्ज करणे सुरक्षित असेल का? उत्तर असे आहे की अशा कारचे चार्जर देखील हवामानरोधक असतात. याचा अर्थ असा आहे की ते प्रत्येक हंगामात कामासाठी तयार केले जातात. ते बनवल्यानंतर, कडक चाचणी केली जाते जेणेकरून त्यांना विद्युत प्रवाहाचा धक्का बसणार नाही याची खात्री केल्या जाते. कंपन्या त्यांच्या बॅटरीवर ओव्हर चार्ज प्रोटेक्शन, शॉक प्रोटेक्शन, शॉर्ट प्रोटेक्शन, क्रॅश टेस्ट यासारख्या अनेक चाचण्या करतात.
जास्त फिचरचा उपयोग केल्याने बॅटरीवरील भार वाढतो?
काही लोकांच्या मनात प्रश्न येतो की इलेक्ट्रिक कारमध्येही खूप वैशिष्ट्ये असतात, मग त्या कारच्या बॅटरीवरचा भार वाढवतात का? उत्तर नाही आहे. बाजारात आणण्यापूर्वी त्यांची पेट्रोल, डिझेल इंधन कार प्रमाणे चाचणी देखील केली जाते. यामध्ये दिलेल्या फीचर्सचीही चाचणी घेतली जाते. गाडी चालवताना एसी चालवायला, लाईट लावायला, वायपर चालवायला किंवा इतर कुठलेही फिचर वापरायला वीज लागते, पण त्यामुळे कारच्या बॅटरी आणि रेंजमध्ये काहीही फरक पडत नाही. बॅटरी पॅक डिझाइन करताना या सर्व गोष्टींचीही काळजी घेतली जाते, त्यानंतर कंपनीकडून कारची रेंज ठरवली जाते.