रामटेक – राजू कापसे
रामटेक आज दिनांक 15/07/2024 रोजी सायं.7.00 वाजता रामटेक येथील दीप हॉटेल येथे सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत “स्वाभिमानी संघर्ष समिती” अशी समिती स्थापन करून एकमताने अन्याय निवारण, भ्रष्टाचार, शासकीय स्तरावरील माहिती स्थानिक लोकांना देऊन त्याचे निवारण करणे तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे अशा विविध विषयांवर चर्चा करून एक मताने स्वाभिमानी संघर्ष समिती असे नाव देण्यात आले.
संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणुन श्री. सुरेशजी वांदिले यांची एकमताने निवड करण्यात आली. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष म्हणून श्री. अनिलजी मुलमुले यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीचे सचिव म्हणुन श्री.सेवकजी बेलसरे यांची एक मतांनी निवड करण्यात आली. तसेच रामटेक विधानसभा क्षेत्र सध्या कार्यरत ठेवून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात रामटेक विधानसभा अध्यक्ष श्री मनोज पालीवाल, विधानसभा उपाध्यक्ष श्री. शुभम दोंदलकर, विधानसभा सचिव श्री. अनीवेश देशमुख, रामटेक तालुका अध्यक्ष श्री. अमीत बादुले,
रामटेक तालुका उपाध्यक्ष विनायक महाजन,रामटेक तालुका उपाध्यक्ष जयपाल बडवाईक, रामटेक तालुका सचिव श्री. प्रफुल्ल पुसदेकर, रामटेक तालुका सहसचिव श्री. नितेश देशभ्रतार, रामटेक शहर अध्यक्ष श्री. बजरंग काटोले, रामटेक शहर सचिव श्री.हरिचंद नागपुरे व देवलापार तालुका अध्यक्ष श्री. नरेंद्र डहरवाल या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. भविष्यात “स्वाभिमानी संघर्ष समिती” जनसामान्यांच्या विवीध समस्यांसाठी निवेदने व आंदोलने हातात घेऊ असे प्रतिपादन स्वाभिमानी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. सुरेशजी वांदिले केले.