बाळापूर – सुधीर कांबेकर
बाळापूर तालुक्यात यावर्षी २३० सार्वजनिक मंडळाद्वारे श्री गणेशाची प्रतिस्थापना करण्यात आली असून तालुक्यातील ३८ गावामध्ये एक गाव एकगणपती ही संकल्पना नागरिकांच्या सहकार्यांने साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीचे दिवशी शहरासह तालुक्यात गणेश मंडळादारे वाजतगाजत ढोलताशाच्यानिनादात गणरायाची भक्तिभावाने प्रतिस्थापना करण्यात आली.
बाळापूर शहरात २०० वर्षा पूर्वि पासून मानाच्या बाराभाई गणेश मंडळाद्वारे गणेशाची स्थापना करण्यात येते यावर्षी मंडळाचे नाना जोशी व राजेंद्रप्रसाद मिश्रा यांचे हस्ते गणेशाची विधीवत पूजा अर्चना करण्यात आली बळापूर पोलिस स्टेशनांतर्गत शहरात २१मंइळाद्वारे श्री गणेशाची स्थापना करण्यातआली.
तर ग्रामीण भागातील १०९ गावामध्ये सुद्धा श्री गणरायाची स्थापनाकरण्यात आली आहे. तसेच उरळ पोलिसस्टेशनांतर्गत १०० ठिकारणी सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे श्रींची स्थापना करण्यातआली आहे. बाळापूर पोलीस स्टेशन.
अंतर्गत १७ ठिकाणी एक गावएक गणपतीही संकल्पनासाकारण्यात आली तर उरळ पोलिस ठाण्या अंतर्गत २१ गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली. गणरायाच्या आगमनाने बच्चे मंडळी सह गणेशभक्तां मध्ये आनंदाचे वातावरण आहे.