Friday, January 10, 2025
Homeविविधअकोल्यात महाराष्ट्र राज्य पदवीधर संघर्ष संघटनेची स्थापना!...सामाजीक कार्यकर्ते डॉ. विजय दुतोंडे यांचा...

अकोल्यात महाराष्ट्र राज्य पदवीधर संघर्ष संघटनेची स्थापना!…सामाजीक कार्यकर्ते डॉ. विजय दुतोंडे यांचा पुढाकार…

पदविधरांच्या आणि बेरोजगाराच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पदवीधर संघर्ष या अराजकीय संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. आजवर आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी विविध शासकीय कार्यालये आणि पदाधिकारी यांचे उंबरठे झिजवून शेवटी निराशाच पदरी आलेल्या सामान्य पदवीधर आणि कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी एकमुखी वज्रमुठी पदविधर संघटनेची मुहर्तमेढ रोवण्याचा संकल्प सामाजीक कार्यकर्ते डॉ. विजय दुतोंडे आणि त्यांच्या टिमने घेतला आहे.

सदर संघटना ही पुर्णतः अराजकीय असून कोणत्याही राजकीय पक्षांशी या संघटनेची बांधीलकी राहणार नाही तसेच फक्त आणि फक्त पदविधरांना न्यायहक्क मिळवून देणे हेच या संघटनेचे ध्येय असेल. तसेच पदवीधरांना रोजगाराच्या संधी, मग त्या शासकीय सेवेतील असोत किंवा खाजगी क्षेत्रातील असो संघटना त्या उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी लढा देणे आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यासाठी वेळोवेळी न्याय्य मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे, आंदोलने उभारून शक्ती प्रदर्शनातून संघटीत संघर्ष करणे, तसेच गेल्या १० ते १५ वर्षापासून विविध शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर कामकाज करणारे कर्मचारी शासकीय सेवेत कायम करून घेण्यासाठी लढा देण्याचा हेतू या संघटनेचा आहे.

संघटनेची स्थापना झाल्यानंतर संघटने सोबत जुळलेल्या विविध शाखेचे पदविधर आणि उच्च शिक्षीत बेरोजगार यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी निस्वार्थीपणे आणि खंबीरणे सहकार्य करण्याचे ध्येय धोरण संघटनेने ठरविले आहे. समाजाचे ऋण म्हणून समाजासाठी कार्य करण्याचे आणि त्यासाठी वेळप्रसंगी लढा देण्याचे हेतुने डॉ. विजय दुतोंडे यांनी जिल्हयातील विविध क्षेत्रातील अराजकीय मान्यवर लोकांना सोबत घेवून हा वसा घेतला आहे. या ध्येयात समाजाचा आरसा म्हणून कार्य करीत असलेल्या सर्वांचाच सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: