(स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शिक्षणासाठी, समाजकल्यानासाठी अभिनव उपक्रम)
आज दि.२० डिसेंबर २०२२ (वार:-मंगळवार) रोजी अकोला येथील सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ, रावणकार हॉस्पिटल अकोला चे संचालक डॉ.अमोल रावणकार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानगंगा विद्यालय खंडाळा ता. बाळापूर येथे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन व रावणकार हॉस्पिटल अकोला यांच्या मार्फत वाचनालयाची स्थापणा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.अमित देशमुख (संचालक :- ज्ञानगंगा विद्यालय खंडाळा),उदघाटक म्हणून मा.डॉ.अमोल रावणकार (सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ,अकोला),प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.राजेश पाटिल ताले(अध्यक्ष :- स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन),प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.अविनाश काळे, प्रतीक ताले(उपाध्यक्ष:-स्वामी विवेकानंद ग्रुप)उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन गेल्या ८ वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे.वाचन चळवळ च्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी स्वामी विवेकानंद ग्रुपने जिल्हाभर जवळपास ६० च्यावर वाचनालय व ६०००० च्या वर पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित केली आहेत.आज वाढदिवसानिमित्त वाचनालयाची स्थापना करून डॉ. अमोल रावणकार यांनी सामाजिक वाढदिवस ही संकल्पना जिल्ह्यामध्ये राबविण्याचा हा पहिलाच प्रयोग केला.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचे वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष झाले आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे आकर्षण वाढावे, याकरिता स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन ने गेल्या ९ वर्षांपासून ग्रामीण भागात वाचन संस्कृती चा प्रचार व प्रसार करण्यासाठी गाव तिथे वाचनालय ही चळवळ हाती घेतली आहे.
वाचनामुळे बौद्धिक विकासासह सर्वांगिण विकास व्हायला मदत होते,सुसंस्कृत समाज घडविण्यास मदत होते.ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणे काळाची गरज असल्याचे राजेश पाटिल ताले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
नवराष्ट्र,नवसमाज निर्मितीसाठी,उद्याची सृजनशील पिढी निर्माण करण्यासाठी वाचन हेच आजच्या काळात प्रभावी शस्त्र आहे :- डॉ.अमोल रावणकार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख सर,सदानंद कारंजकर,शरद लव्हाळे तसेच इतरसर्व शिक्षक, कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.