Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकमूर्तिजापूर | 'मेरी लाईफ...मेरा स्वच्छ शहर' अभियान अंतर्गत RRR केद्रांची स्थापणा व...

मूर्तिजापूर | ‘मेरी लाईफ…मेरा स्वच्छ शहर’ अभियान अंतर्गत RRR केद्रांची स्थापणा व उदघाटन…

मूर्तिजापूर : केंद्रिय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने “मेरी लाईफ , मेरा स्वच्छ शहर” अभियान अंतर्गत दि. २० मे २०२३ ते ०५ जुन २०२३ पर्यंत या अभियाना अंतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थना “रिड्युस, रियुज आणि रिसायकल“ सेंटर्स म्हणजेच RRR केंद्र स्थापण करणेचे निर्देश दिले आहे. त्यानूसार सदर अभियानात नगर परिषद मुर्तिजापूर सहभाही असुन नगरपालीकेमार्फत न.प.चे कार्यालयीन परिसरात सीएलसी केंद्र येथे दि. २० मे २०२३ पासुन ते ०५ जुन २०२३ पर्यंत RRR केंद्र स्थापण केलेले आले.

सदर RRR केंद्राचे आज दिनांक २०/५/२३ शनिवार रोजी मुर्तिजापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रीय आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले असुन उद्घाटन प्रसंगी, नगर परिषद चे माजी नगराध्यक्षा मोनालीताई गावंडे, माजी नगरसेवक तसलीमखा बिस्मिल्लाखा, समाजसेवक राहुल गुल्हाने, कमलाकर भाऊ गावंडे, संदीप जळमकर, गजानन नाकट, प्रकाशराव मुळे, निक्की महाजन, उपमुख्यधिकारी श्री अमोल बेलोटे, शहरांतील स्वयसेवी संस्था चे पदाधिकारी स्काऊट गाईड फेलोशिप सदस्य चंदन अग्रवाल, प्रकाशवाट प्रकल्प चे अविनाश बांबल सर, मुर्तिजापूर स्वच्छता अभियान टीम चे विलास नसले, नेहरू युवा केंद्र चे विलास वानखडे महिला बचत गटांचे सदस्य पदाधिकारी , नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते.

याद्वारे शहरातील नागांरीकांकडे असलेले वापरन्यालायक स्वच्छ कपडे , पादत्राणे ( चप्पल व बूट ) , जुने पुस्तके , प्लॅस्टिक वस्तू तसेच अन्य वापरात नसलेल्या वस्तू ज्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे असल्या वस्तू गोळा करुन न.प. ने स्थापण केलेल्या RRR केंद्रात जमा करणेसाठी आवाहन करण्यात आले. तसेच शहारातील सेवाभावी संस्था आणि महिला बचत गट यांनी सदर अभियानात सहभागी होऊन शहरात अभियानाची जनगाजृती करावी व नागरिकांनी सदर वस्तू ह्या नगर परिषद द्वारे सुरू केलेल्या आर आर आर.(रिडयुस, रियुज, आणि रिसायकल) केंद्र वर आणून द्याव्या किंवा आपल्या प्रभाग परिसरात स्वंयमस्फुर्तीने बचत गट, एनजिओ संस्था यांनी सहकार्य करून सदर साहित्य जमा करून आठवड्यातून एक दिवस हे साहित्य नगर परीषद वाहना व्दारे या केंद्रात जमा करावे व गरजू व्यक्तींना या मधील वापरण्यास योग्य वस्तू वितरित करण्यात यावा अश्या सूचना मा. आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी यावेळी दिल्या , यावेळी स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थाचे सदस्य व बचत गटांचे सदस्य यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भुगुल सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान चे शहर समन्वयक केतन चिंचमलातपूरे यांनी केले .

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: