यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूरचे आयोजन…
नागपूर – शरद नागदेवे
हिगंणा -महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूर यांच्यावतीने निबंध स्पर्धेचे आयोजन स्व देवकिबाई बंग इंग्लिश मिडीयम स्कूल हिंगणा येथे करण्यात आले होते.
हि निबंध स्पर्धा “यशवंतराव चव्हाण एक बहुआयामी व्यक्तिमत्व” या विषयांवर घेण्यात आली होती त्यात स्व. देवकिबाई बंग इंग्लिश मिडीयम स्कूल व नेहरू विद्यालय या दोन्ही शाळेच्या 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट निबंध सादर केले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण हिंगणा येथील स्व देवकीबाई बंग विद्यालयात यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूरचे अध्यक्ष महेश बंग यांच्या अध्यक्षतेखाली कोषाध्यक्ष रवीं देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्व. देवकिबाई बंग हायस्कूल विभागात कु.समृद्धी अंभोरे व द्वितीय जय गायकवाड तर तृतीय पराग भांगे व नेहरू विद्यालय हायस्कूल विभागात प्रथम भक्ती उघडे व द्वितीय कोमल वानखेडे तसेच तृतीय मृणाली भाजीपाले यांना देण्यात आले तर कनिष्ठ विद्यालयातून स्व. देवकिबाई बंग चे प्रथम क्रमांकावर नंदिनी कैलुके द्वितीय सलोनी डोईफोडे व तृतीय प्रियांका भगत यांना पारितोषिक यांना देण्यात आले..
कार्यक्रमाला संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष अरुणा बंग, स्व. देवकीबाई बंग विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर, नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद महल्ले केयांनी तर आभार श्वेता तूपेकर यांनी मानले.