सांगली – ज्योती मोरे
महिलांना सर्वच क्षेत्रात आर्थिक दृष्टया सक्षम करण्याच्या उद्देश्याने अजिंकीयन्स वुमन्स फौंडेशनच्यावतीने 18 आणि 19 मार्च रोजी राजमती भवन येथे महिलांसाठी वर्कशॉप आणि ऐशानी एक्झिबिशन चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापिका मंजिरीताई गाडगीळ, स्मिता घेवारे यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी ममता शाह, विद्या खिलारे उपस्थित होते.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने महिलांसाठी उद्योगाविषयी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.सातारा सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थी यांच्या पत्नींनी एकत्र येऊन स्त्रियांच्या प्रगतीसाठी 2018 साली अजिंकीयन वुमन फौंडेशनची स्थापना केली.अनेक उपक्रम हाती घेऊन महिलांना सर्व दृष्टीने सक्षम करण्यासाठी अनेक ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यात आले,यात गोधडी वर्कशॉप,मिरज तालुक्यातील बुधगांव येथे पाककला स्पर्धेची आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी 5 आणि नाविन्यपुर्ण प्रदर्शन शनिवारी-रविवारी राजमती भवन याठिकाणी होणार आहे. या प्रदर्शनात नाविन्यपुर्ण वस्तू, कुर्तीज, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, हस्तकलेच्या कलाकृतीचे तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असतील. या ऐशानी प्रदर्शनाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी यांच्या पत्नी डॉ. शैलाजा सी, महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या पत्नी सुषमा पवार यांच्या हस्ते होणार आहे.18 रोजी 4 वाजता खादी ग्रामद्योग ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
त्याच दिवशी 5 वाजता म्यूच्युअल फंड अवेयरनेस कॅम्प घेण्यात येणार आहे. 19 रोजी करिअर गायडन्स आणि नोकरीसाठी मोफत नोंदणी होणार आहे. 5 वाजता पर्सनल मेकअप आणि साडी ड्रेपिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.