सांगली – ज्योती मोरे
पवित्र पोर्टल मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु ते पोर्टल रद्दच करा अशी मागणी जर होत असेल, तर ते कदापी होणार नाही. असे उद्गार राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या महा अधिवेशनात काढले आहेत. दरम्यान शिक्षक भरती बाबत येणाऱ्या अधिवेशनानंतर एका महिन्याच्या आत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रियाही मंत्री केसरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा सुप्रियाताई सुळे महाधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे माजी मंत्री जयंतराव पाटील माजी मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर वैभव नायकवडी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आदी मान्यवरांसह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे पदाधिकारी, राज्यभरातील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.