Sunday, November 17, 2024
Homeराज्यसंघटन मजबुतीसाठी महिलांचा बरोबरीचा सहभाग आवश्यक - माजी राजेंद्रजी जैन…

संघटन मजबुतीसाठी महिलांचा बरोबरीचा सहभाग आवश्यक – माजी राजेंद्रजी जैन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करायचे असेल तर प्रत्येक बूथ कमेटी मध्ये महिलांचा सहभाग बरोबरीचा असला पाहिजे, महिला कार्यकारणी व संगठन मध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतांना माजी आमदार राजेंद्र जैन बोलत होते.

आज राष्ट्रवादी कांग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे तालुका महिला पक्ष पदाधिकारी व कार्यकारिणीची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प. सभापती पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.

यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीने गोंदिया तालुका अध्यक्षा म्हणून कीर्ती पवन पटले, बिरजूलाबाई भेलावे, व महीला रा.का.पा जिल्हा सचिव पदावर रजनी गौतम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्तांचे अभिनंदन केले.

या बैठकीला राजेंद्र जैन, पूजा अखिलेश सेठ, रजनी गौतम, अश्विनी पटले, नेहा तुरकर, कीर्ती पटले, सरला चिखलोंडे, संगीता पतहे, प्रीती सेलोटे, स्वाती टेभरें, पूजा उपवंशी, आशा बाळने, रविकला नागपुरे, विमला श्रीभारे, अर्चना चौधरी, पायल बागळे, सुंदरी तांडेकर, योगिता भालाधरे, माधुरी तुरकर, छाया कावळे, कुशुलाबाई दवारे, टोमेश्वरी चुलपार,

नीला गौतम, सविता पारधी, सविता पटले, नानेश्वरी कटरे, अनिता सिँहमारे, शईम भांडारकर, कुंदा साठवणे, सुनीता बराईकर, लेखेश्वरी हरिणखेडे, मीना येळे, शारदा बिसेन, प्रमिला उईके, सरस्वताबाई पंधरे, मालती पंधेर, पूशतकला लांजेवार, शशिकला गायधने, कैलास पटले, अखिलेश सेठ, राजकुमार जैन, राजू येळे, रिताराम लिल्हारे,

विजय लिल्हारे, विजय रहांगडाले, रतिराम राणे, तिलक भांडारकर, गंगाराम कापसे, राधेश्याम पटले, सुनिल पटले, शैलेश वासनिक सहीत मोठया संख्येने महीला संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: