EPFO : वित्त मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. यापूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सरकारला एवढे व्याज देण्याची शिफारस केली होती. आता, सरकारच्या वतीने, अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे.
EPFO ने 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर व्याजदर वाढवला आहे. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजदर 8.15 टक्के करण्यात येणार आहे. 21-22 या आर्थिक वर्षात हा दर 8.10 टक्के होता. मार्चच्या सुरुवातीला, दोन दिवसीय बैठकीत, EPFO ने आपल्या सदस्यांसाठी 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती. यानंतर, 2022-23 साठी EPF ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यासाठी, तो मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता, त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, 2022-23 साठी EPF वरील व्याजदर EPFO च्या पाच कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.
माहितीप्रमाणे, देशातील सुमारे 6 कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) च्या कक्षेत येतात. EPFO कायद्यानुसार कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या 12% आणि DA भविष्य निर्वाह निधीमध्ये जातो. याशिवाय, कंपनी कर्मचार्यांच्या निधीमध्ये मूळ पगाराच्या 12% आणि डीए देखील जमा करते. कंपनीच्या १२% योगदानापैकी ३.६७% पीएफ खात्यात जाते तर ८.३३% पेन्शन योजनेत जाते.
भविष्य निर्वाह निधीमधील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीची बैठक घेतली जाते. ही समिती आर्थिक वर्षात जमा झालेल्या रकमेची माहिती देते. त्यानंतर CBT बैठकीत निर्णय घेतला जातो, त्यानंतर अर्थमंत्रालयाच्या संमतीनंतर व्याजदर ठरवला जातो.