मुंबई – गणेश तळेकर
अभिनेते जनार्दन सोनवडेकर यांच्या दादर येथील निवासस्थानी प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही मंगळवार, दि. १९ ते २३ सप्टेंबर २०२३. या कालावधीत “गणपती बाप्पा” “विराजमान” झाला आहे.
गणेशोत्सवा मधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने सजावटीमध्ये संपुर्ण पेपर वापरून शिवानंदी बनवला आहे . तसेच गणेशाची मूर्ती हि साडूच्या मातीची बनवली आहे.
सदर सजावटीची संकल्पना निकिता सोनवडेकर हिची असून विजय सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश, दुर्वा सोनवडेकर , रोहित मेस्त्री , कौस्तुभ, विपुल , ओमकार मेस्त्री , ओमकार राणे, चेतन यांचें विशेष सहकार्य लाभले.
त्याचप्रमाणे सौ. तेजश्री, प्रियांका, संगीता सोनवडेकर, उषा मेस्त्री, यांच्या चविष्ट प्रसाद आणि सुग्रास भोजनाचा गणेश भक्तांनी आस्वाद घेतला. बाप्पाच्या दर्शनासाठी सोनवडेकर परिवाराचे नातेवाईक मित्र परिवार यांनी पारंपरिक पद्धतीने महाआरती करून बाप्पाचे दर्शन घेऊन महा प्रसादाचा लाभ घेतला.