Sunday, December 22, 2024
Homeराजकीयअमरावती लोकसभा मतदारसंघात आणखी एका बळवंत वानखडेची एन्ट्री...मतदार विचलित होणार का?...

अमरावती लोकसभा मतदारसंघात आणखी एका बळवंत वानखडेची एन्ट्री…मतदार विचलित होणार का?…

अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी कालच सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर आजच अर्ज छाननी झाली असून या निवडणुकीसाठी 59 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. त्यानुसार 56 अर्ज पात्र तर तीन नामनिर्देशने अपात्र ठरविण्यात आली आहेत. तर या मतदार संघात महाविकास आघाडी कॉंग्रेस कडून बळवंत वानखडे यांचा अर्ज दाखल असून काळ पुन्हा एका बळवंत वानखडे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दुसरे बळवंत हरिभाऊ वानखडे हे अमरावती आनंद नगर येथील रहिवासी असून त्यांच्या वडिलांच्या नावात फरक असल्याचे आढळून आले. तर कॉंग्रेस कडून ज्यांनी उमेदवारी दाखल केली त्यांचे नाव बळ्वंत बसवंत वानखडे असून ते दर्यापूर तालुक्यातील लेह्गाव खुर्चनपूर येथील रहिवाशी आहेत.

सध्याच्या घडीला अमरावती मतदार लोकसभा संघात बळवंत नावाची मोठी चर्चा सुरु आहे. त्यामुळे शहरातील प्रतिष्ठीत लोक कॉंग्रेसच्या उमेद्वारच्या पाठीशी पाहायला मिळत आहे. कालच अमरावती जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते,उत्कृष्ठ संसदपटू आणि विदर्भाच्या मागासलेपणावर सातत्याने लढणारे माजी आमदार प्रा.श्री.बि.टी.देशमुख सर यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले.याप्रसंगी त्यांचे समवेत माजी पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर,माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख,माजी महापौर मिलिंद चिमोटे,जिल्हा परिषद माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर आदी लोक उपस्थित होते.

बळवंत वानखडे हे सध्याचे दर्यापूर विधानसभेचे आमदार असून आपल्या शांत, संयमी स्वभाव असल्यामुळे लोक त्यांना आकर्षित होतात.म्हणूनच सध्याच्या घडीला त्याचं नाव समोर येत असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी कोणीतरी या दुसर्या बळवंत वानखडे यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला असेल, मात्र बळवंत वानखडे हे कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हावर उभे असून त्यांना कावडी मात्रही फरक पडणार नाही अशी काही राजकीय जाणकारांचे मत आहे.

बळवंत हरिभाऊ वानखडे हे कोण आहेत त्यांनी निवडणूक अधिकार्याला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र वाचा…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: