पातूर – सचिन बारोकार
राष्ट्रीय युवा दिन आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त रविवार दि.१२/०१/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पातूर येथे उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमा निमित्त संस्थेत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये आर्टिफिसिअल इंटिलिजन्स शॉप की वरदान, आत्मनिर्भर भारत, स्वामी विवेकानंद यांचे उद्योजकता कौशल्याबद्दल विचार आणी देशाच्या विकासात कौशल्याचे महत्त्व या विषयावर रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व वाद विवाद स्पर्धा अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहें.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त व साने गुरुजी मंडळ,पातूर चे अध्यक्ष युवा प्रबोधनकार श्री सागर ना.राखोंडे तसेच युवा उद्योजक श्री.डिगांबर दत्ता ढाळे श्री विश्वकर्मा उद्योग 3D शिर्ला यांची उपस्थिती राहणार आहे तरी जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमात सहभागी होऊन माहिती घ्यावी असे आव्हान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पातूर कडून करण्यात येत आहे.