Sunday, December 22, 2024
Homeराज्यमनपा मध्‍य झोन मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न...

मनपा मध्‍य झोन मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

अमरावती शहर महानगरपालिका अमरावती अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान द्वारे शहरातील महिला बचत गटासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत तीन दिवसीय ” उद्योजकता विकास प्रशिक्षण दिनांक ११/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ या कालावधीत आयोजित कऱण्यात आले होते.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षण उत्‍तमरित्‍या व सोप्‍या भाषेत घेण्‍यात आले. दिनांक १३ मार्च,२०२४ रोजी मध्‍य झोन क्र.२ राजापेठ येथे अमरावती महानगरपालिका दीनदयाळ अंत्‍योदय योजना राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियानाच्‍या DAY-NULM च्‍या वतीने प्रशस्‍तीपत्र वाटपाचे आयोजन करण्‍यात आले.

यावेळी महानगरपालिका आयुक्‍त देविदास पवार यांच्‍या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र वाटप करण्‍यात आले. या प्रसंगी महिलांना संबोधित करतांना मा. आयुक्त देविदास पवार म्हणाले की, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपले उद्योग उभारावे कारण महिला या उत्तम आर्थिक व्यवस्थापन आपल्या दैनंदिन जीवनात करत असतात.

तसेच त्यांच्या मध्ये उपजतच कौशल्य गुण असल्यामुळे चांगल्या उद्योजिका म्हणून नावारूपाला येऊ शकतात. महीला बचत गटासाठी अमरावती महानगरपालिका द्वारे सर्व प्रकारचे आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य केले जाईल. हा प्रशिक्षण कार्यक्रम दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान विभागांतर्गत आयोजित करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख एन.यु.एल.एम. विशेष कार्यकारी अधिकारी पी.यु. वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.यु.एल.एम. च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. यावेळी सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, एन.यु.एल.एम. विशेष कार्यकारी अधिकारी पी.यु. वानखडे, सहाय्यक प्रकल्‍प संचालक तथा व्यवस्थापक वंदना गुल्‍हाणे,

व्‍यवस्‍थापक भुषण बाळे, प्रफुल ठाकरे, मयुरी दुचाकी, प्रफुल्ल कुकडे , रेणुका कापूसकर , उज्वला मेश्राम , प्रतिबा इंगळे, सिंधू बोरकडे , अरुणा मनोहरे, दिगंबर तायडे , सुषमा किनगावकर , छाया खंडारे , प्रतिभा काठोडे , मनीषा शेंडे , सुषमा डोळस , समूह संघटक,  बचत गटातील महिला, मनपा कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: