Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीतामगाव येथील उद्योजकांची गळफास घेऊन आत्महत्या!...

तामगाव येथील उद्योजकांची गळफास घेऊन आत्महत्या!…

कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र ढाले
तामगाव येथील फर्निचर व्यवसाय करणारे उद्योजक प्रदिप राजाराम सासणे (वय३६) यांनी गुरुवार दि.१ रोजी सकाळी राहत्या घराशेजारी दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

गळफास लावल्याची घटना उघडकीस येताच त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर मध्ये दाखल केले होते. पण यावेळी डाॅक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.प्रदिप राजाराम सासणे यांचा तिघांच्या भागीदारीमध्ये गोकुळ शिरगाव येथे फर्निचरचा कारखाना आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्वी यांची भागीदारी संपुष्टात आली होती.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.या घटनेची नोंद.डाॅक्टर नवज्योत वैद्यकीय अधिकारी सिपीआर यांनी दिली आहे.या घटनेचा तपास सहायक फौजदार खोत व पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: