मा. राजेंद्र मुळक, तक्षशिला वागधरे, रश्मीताई बर्वे, शांताताई कुमरेंची उपस्थिती…
रामटेक – राजु कापसे
रामटेक :- देवलापार येथिल विद्या सेलीब्रेशन हॉल महिला मेळावा व संक्रांती निमित्य हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्या शांता कुमरे होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केले तर प्रमुख पाहुणे जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, तक्षशिला वागधरे, पंचायत समितिच्या माजी सभापती कला ठाकरे हे होते.
दीप प्रज्वल करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्याने महिलांची रांगोळी स्पर्धा, उखाने स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत धनश्री निघोट, द्वितीय क्रमांक सोनम उईके, तृतीय अनिता मानकर यांनी पटकाविला.
उखाने स्पर्धेत प्रथम क्रमांक दिपिका पारखी व विशाखा खंडाते यांना संयुक्त, द्वितीय क्रमांक आरती मडावी व अनिता सोनटक्के यांना तर तृतीय क्रमांक अंजली पुराम व कांता चाखले यांनी मिळविला.
तर संगीत खुर्चीत अप्रोज शेख यांना मिळविला. यावेळी गोंडी नृत्य सुध्दा सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन किर्ती आहाके, यांनी पुष्पा निघोट यांनी आभार मानले यावेळी गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला देवलापारच्या सरपंच सारीका उईके, लोकमत सखी मंच देवलापार च्या पुष्पा निघोट, खनोराच्या सरपंच सरला खंडाते, कट्टाच्या सरपंच वनिता टेकाम, पंचफुला मडावी, कल्पनाताई भलावी, वनिता टेकाम, अनुराधा गडेर , शाहिस्ता पठाण, कीर्ती आहाके, शिल्पाताई पेंदाम, मोनिका पोहरे, कांचनमाला माकडे, सुनिता मानकर,सुनीता भलावी, राजश्रीताई कांबडी, कौशल्या कुंभारकर, राणीताई गुप्ता,मुक्ताताई वाडीवे पल्लवीताई श्रीरामे, आदी उपस्थीत होते