Monday, December 23, 2024
Homeराज्यकोगनोळी येथे नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद...

कोगनोळी येथे नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रजावाणी फौंडेशनचे संस्थापक नारायण बिरु कोळेकर यांच्या व्दितीय पुण्यस्मरणिनिमित्त गुरुवार दि.22 रोजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन कोगनोळी येथे प्रजावाणी फौंडेशन आणि कल्लोळी इन्स्टिटयुट आँफ हेल्थ केअर सर्विसेस संचलित कल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी सुमारे 140 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर काही नागरिकांचे शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली. या शिबिरामध्ये कोगनोळी व परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग घेतला .प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक लक्ष्मण जगताप यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पूजन तात्यासो कागले यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर नारायण कोळेकर यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासो कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

eye check-up camp

याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य कृष्णात खोत,ग्रा.पं.सदस्य राजुगोंडा पाटील,ग्रा.पं.सदस्य रुपाली वडर ,ग्रा.पं.सदस्य मनिषा परीट,ग्रा.पं.सदस्य शोभा मानगावे,डॉ.बाळासो पाटील,महादेव इंगवले,अर्जुन कागले,प्रकाश गायकवाड,बिरसु कोळेकर,तात्यासो खोत,अमर विटे,अँड.प्रशांत नवाळे,प्रवीण पाटील,नरजीत विटे,विठ्ठल मु कोळेकर,संतोष माने,सचिन परीट,

युवराज परीट यांच्यासह कल्लोळी नेत्रालय मधील डॉ.कमर शेख,सुधीर सावरडे,इकलास खान आदी उपस्थित होते.यावेळी कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्दचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत यांनीही या कार्यक्रमाला सदिच्छ भेट दिली.आभार व सुत्रसंचालन अरुण पाटील यांनी केले…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: