भाजप बूथ सशक्तीकरण अभियानास प्रारंभ…
खामगाव – हेमंत जाधव
राज्यात येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपचा मोठा विजय व्हावा यासाठी महाविजय अभियान राबविण्यात येत आहे, हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बूथ सशक्त करा असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. खामगाव मतदार संघाचा आज 8 फेब्रुवारी रोजी स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदीर सभागृहात बूथ सशक्तीकरण अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ अँड फुंडकर बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागर फुंडकर होते , तर भाजप जिल्हा महामंत्री मोहनजी शर्मा, जिल्हासचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, डॉ एकनाथ पाटील, खामगाव तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, चंद्रशेखर पुरोहित, शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतीडक, शेगाव माजी कृ उ बा स अध्यक्ष गोविंदराव मिरगे, राजेंद्र देवचे, बेटी पढाव बेटी बचाव अभियान जिल्हा संयोजक सौ आणिताताई देशपांडे, खविस उपाध्यक्ष सौ गोदावरीताई ढोण, सौ रत्नाताई डीक्कर आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ अँड फुंडकर म्हणाले की गेल्या पंधरवड्यात नाशिक मध्ये झालेल्या भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठकीत महाविजय अभियान राबविण्याची घोषणा करण्यात आली. लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष असतांना त्यांनी शत प्रतिशत भाजपा हे घोषवाक्य दिले होते, आणि ते आज राज्यासह देशात ते दिसून येत आहेत ते आपल्या कार्यकर्त्यामुळेच, आताही नाशिकच्या अधिवेशनात महाविजय अभियान ची घोषणा करण्यात आली ती राज्यात राबविण्यात येत आहे.
गेल्या आठ वर्षात कधी नव्हे एवढे हजारो कोटींचे विकास कामे मतदार संघात झाली, प्रत्येक गावात ,प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली. याची पावती विरोधकही देतात. कारण आठ वर्षात एकही आरोप विरोधक करू शकले नाहीत. त्यामुळे मोठ्या विजयासाठी प्रत्येक बूथ स्तरावर , प्रत्येक नागरिकांना झालेल्या कामांची माहिती द्या, जोमाने कामाला लागा असे आवाहन यावेळी आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. तत्पूर्वी सागरदादा फुंडकर, डॉ एकनाथ पाटील , सौ अनिता देशपांडे, सौ रत्नाताई डिक्कर यांनीही मनोगत व्यक्त केले.
तर रघुनाथ खेर्डे यांनी सरल व नमो अँप बद्दल माहिती दिली. याप्रसंगी राजकीय परिस्थिती वर सुरेश गव्हाळ यांनी तर कृषी विषयक धोरणावर शरदचंद्र गायकी व विलास काळे यांनी ठराव मांडला. महिला दिन असल्याने यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संचालन शांताराम बोधे तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने भाजप पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख , बुथ प्रमुख उपस्थित होते.