Thursday, July 18, 2024
spot_img
Homeराज्यस्पेस ओन व्हील आंतरिक्ष महायात्रेला उदंड प्रतिसाद : हजारो विद्यार्थी, शिक्षक व...

स्पेस ओन व्हील आंतरिक्ष महायात्रेला उदंड प्रतिसाद : हजारो विद्यार्थी, शिक्षक व पालकांची उपस्थिती…

सावित्रीबाई फुले विद्यालयाचा पुढाकार…

पातूर – निशांत गवई

भारतीय अंतराळ प्रवासाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना व्हावी या उदात्त हेतूने पातुर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय येथे स्पेस ओन व्हील या फिरत्या अंतराळ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. अंतराळ प्रदर्शनीसह भितीपत्रके, रांगोळी स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा सह अंतराळ प्रदर्शनी पाहण्यासाठी पातुर तालुक्यातील तब्बल 52 शाळांमधून 4500 पेक्षा अधिक विद्यार्थी व पालकांनी या अंतरिक्ष महायत्रीला भेट दिली.

पातुर तालुक्यात स्पेस ऑन व्हील या फिरत्या अंतराळ प्रदर्शनी आयोजनाचा तालुक्यात नवोपक्रम नोंदवला. विद्यार्थ्यांना विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा चढता आलेख व भारताने अंतराळ संशोधनात केलेल्या कामगिरीचे कौतुक करत माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान सकाळी सावित्रीबाई फुले विद्यालय पातूरच्या प्रशस्त प्रांगणात झालेल्या अंतरिक्ष महायात्रेचे उद्घाटन देशोन्नती वृत्तपत्र समूहाचे सर्वेसर्वा प्रकाश पोहरे यांनी केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिताताई पाटेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सपनाताई म्हैसने,सचिव सचिन ढोणे,गटशिक्षणाधिकारी दीपमाला भटकर, विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर,तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सुनील वावगे, पातुर पंचायत समितीचे गट साधन व्यक्ती अनिल चिकटे, राजेंद्र कटरे, केंद्रप्रमुख माजिद हुसैन , इस्रो बसचे तालुका समन्वयक श्रीकृष्ण शेगोकार,दिनेश करोडदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशोन्नती वृत्तपत्र समूहाचे सर्वेसर्वा प्रकाश पोहरे यांनी सुद्धा अंतराळ प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अंतरिक्ष वैज्ञानिकांच्या गौरवार्थ शाळेत काढलेल्या चंद्रयान 3, वैज्ञानिकांच्या प्रतिकृती सोबत विद्यार्थी -शिक्षक आणि नागरिकांचे लक्षवेधीत होत्या.

विविध शाळेतील विद्यार्थी शिक्षक चंद्रयान 3 च्या प्रतिकृती सोबत फोटो काढताना अभिमान व्यक्त करत होते. तब्बल दहा तास चाललेल्या अंतरिक्ष महायात्रेला पातुर तालुक्यातील तब्बल 52 शाळांमधून 4200 विद्यार्थी व जवळपास 1000 नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी केला.

फिरत्या अंतराळ प्रदर्शनी बरोबरच अंतराळ विज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धा, भित्तिपत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रांगोळी स्पर्धेत 45,भित्तिपत्रक 45, व प्रश्नमंजुषा स्पर्धेत 36 असे एकूण 126 स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे परीक्षण सावित्रीबाई फुले विद्यालयासह विज्ञान अध्यापक मंडळाचे सदस्य व विज्ञान शिक्षक यांनी केले. स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षीस,प्रमाणपत्र व “विज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याची अज्ञात गाथा” हे पुस्तक देऊन गौरवण्यात आले.

या अंतरिक्ष महा यात्रेचे आयोजन नियोजन शाळेच्या भव्य प्रांगणात करत संस्थेच्या अध्यक्षा सपनाताई म्हैसने, सचिव सचिन ढोणे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला. अशा सकारात्मक प्रतिक्रिया शहरातील नागरिकांसह तालुक्यातील शिक्षक व पालकांनी दिल्या

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: