Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीतीनं छोट्याशा बाळाला ICU मध्ये ठेवून जीवन संपवलं…स्वतःला संपवण्यामागचे कारण काय?…अकोला सर्वोपचार...

तीनं छोट्याशा बाळाला ICU मध्ये ठेवून जीवन संपवलं…स्वतःला संपवण्यामागचे कारण काय?…अकोला सर्वोपचार रुग्णालयातील धक्कादायक घटना…

अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली. एका महिलेने रुग्णालयाच्या शौचालयात आपल जीवन संपविल. या महिलेचं बाळ सीसीयूमध्ये भरती होते. आणि ती बाळाला सोडून गेल्या चार दिवसापासून ती बेपत्ता झाली होती. अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर आज रुग्णालयातील एक शौचालयात ती मृतावस्थेत आढळून आलीय.

आज सकाळी शौचालयातून दुर्गंधी येत होती. दरवाजा आतून बंद असल्याने संशय आला. सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शौचालयाचे दार तोडले. शौचालयात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सारेचं हादरले.

मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पण या महिलेने का आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहे. या महिलेला मुलगी झाली असल्याने या महिलेने आत्महत्या केली असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरु होती. पोलीस तपासानंतरच ही बाब स्पष्ट होईल. मात्र, छोट्याशा बाळाला ठेवून तीनं जीवन संपवलं. त्यामुळं ते बाळ आता आईविना पोरकं झालं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: