नरखेड – अंत्योदय मिशन, देवग्राम अमोई फेस्टिव्हल ,2023 मध्ये जीवन विकास परिवार देवग्राम च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन आयोजक डॉ. कल्याणी ठाकरे ,जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
महिला मेळाव्याचे प्रास्ताविक भाषण डॉ. कल्याणी ठाकरे, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम यांनी उत्कृस्ट अशाप्रकारे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतीताई बन्सोड, ग्रामगीताचार्य, बेलोना ह्या होत्या. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीने सक्षम होणे ही आज काळाची गरज आहे,तसेच महिला सबलीकरण म्हणजे त्या स्त्रीला समान हक्क आहे, तिला समान पुरुषांच्या बरोबरीने तिला समान दर्जा मिळतो.
तिला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतो. स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी पुरेपुर संधी देतो तरच पूर्ण अर्थाने सबलीकरण झाले असे म्हणता येईल. असे प्रतिपादन त्यांनी काढले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मृणालिनी शर्मा, स्त्री-रोग प्रसुती तज्ज्ञ,वरुड ह्या होत्या. त्यांनी सुद्धा स्त्रियांना येणाऱ्या आरोग्यविषयक समस्या आणि अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे उपस्थितीत श्रीमती सुषमा बढिये ,श्रीमती लताताई धोटे, ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमामध्ये जवळपास 200 स्त्रियांनी भाग घेतला. अमोई फेस्टिवल च्या निमित्ताने जानेवारी महिन्यात महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळ गूळ घ्या गोड गोड बोला याप्रमाणे तीळ गुळाचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे, खेळीमेळीच्या,आनंदमय वातावरणात ,सर्वच स्त्रियांनी आवर्जून सहभागी होऊन महिला मेळाव्याचा पुरेपूर फायदा घेतला.
महिला मेळाव्याच्या आयोजिका डॉ कल्याणी ठाकरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत आणि परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रणाली इंगोले,जीवन विकास महाविद्यालय,देवग्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पूजा बोन्द्रे, प्राचार्या, AIMS ,स्कूल, देवग्राम यांनी केले.