Tuesday, December 24, 2024
Homeराज्यअकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा...

अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा…

akl-rto-3

अकोला – संतोषकुमार गवई

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे रोजगारइच्छूक महिलाभगिनींसाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे विशेष पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील धूत इलेक्ट्रिकल्स, अबेल इलेक्ट्रो-सॉफ्ट टेक्नॉलॉजी, पिंपल ट्री वेंचर, टॅलेनसेतू आदी आस्थापना, कंपन्यांतील 284 पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी.

इच्छूक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह मेळावास्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले. अधिक माहितीसाठी (०७२४) २४३३८४९ या दूरध्वनी किंवा ९६६५७७५७७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: