Elvish Yadav arrested : रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विषाचा वापर केल्याच्या प्रकरणावरून एल्विश यादवला राजस्थानच्या कोटा येथून अटक केल्याची बातमी येत आहे. OTT बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादववर एका रेव्ह पार्टीत सापाचे विष दिल्याचा आरोप आहे. सुप्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव अलीकडेच नोएडामधील रेव्ह पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बातमी आल्यानंतर सलमान खानने एल्विश यादवला पाठिंबा दिला होता. अलीकडेच एल्विश यादव ‘बिग बॉस 17’ च्या सेटवर दिसला होता. ‘बोलेरो’ म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी एल्विश बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता.
उत्तर प्रदेशातील नोएडातील सेक्टर-49 कोतवाली परिसरात सेक्टर-51 मधील सेफ्रॉन वेडिंग व्हिला येथे आयोजित रेव्ह पार्टीसाठी सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली होती. अटकेवेळी स्थानिक पोलिसांसह वनविभागाचे पथकही उपस्थित होते. अटकेनंतर चौकशीदरम्यान सेलिब्रिटी आणि बिग बॉस विजेता एल्विश यादवचे नाव पुढे आले होते. हे नाव समोर आल्यानंतर नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन केले आणि नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली. तर आता प्रकरणावरून एल्विश यादवला राजस्थानच्या कोटा येथून अटक केल्याची माहिती मिळत आहे.
6 तस्करांना अटक, 9 विषारी साप जप्त
या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, सहा तस्करांना अटक करताना पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने त्यांच्याकडून पाच कोब्रा, दोन डोक्याचे साप, एक लाल नाग आणि एक अजगर पकडला आहे. आरोपींकडून प्लास्टिकच्या बाटलीतील 25 एमएल सापाचे विषही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अटकेवेळी तस्करांकडून जप्त केलेल्या बॅगेत वेगवेगळ्या कप्यात एकूण 9 साप आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तस्करांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो.
एल्विश यादव को कोटा पुलिस ने हिरासत में लिया
— News24 (@news24tvchannel) November 4, 2023
◆ राजस्थान पुलिस ने किया नोएडा पुलिस को सूचित
◆ एल्विश पर रेव पार्टी और सांपों की तस्करी का है आरोप
◆ बीते दो दिन से नोएडा पुलिस कर रही तलाश #ElvishYadav #NoidaPolice | Elvish Yadav Arrested Kota pic.twitter.com/elyVKi37aP