स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी येत्या १ जानेवारीला नागपुरात मोठ आंदोलन होणार आहे. विदर्भातील शेतकरी नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप हे आपल्या सहकाऱ्यांसह संविधान चौक, नागपूरात २७ डिसेंबर २०२३ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनास शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सुद्धा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा बुलढाण्यातुन पाठिंबा जाहीर केला.
ऍड. वामनराव चटप यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई मामरडे यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. आमरण उपोषण आंदोलनाचे समर्थनार्थ विदर्भ भर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन चालू आहे.
विदर्भातील जनता मोठ्या संखेने या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. यासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व विदर्भवादी कार्यकर्तानी व शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली आहे. तरुणांनी दिनांक १ जानेवारी २०२४ रोज सोमवारला मोठ्या संख्येने संविधान चौक, नागपूर येथे उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सुद्धा केले आहे.