Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयअकोला जिल्ह्यातील नवगठित २६६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांची निवडणूक घोषित…..

अकोला जिल्ह्यातील नवगठित २६६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांची निवडणूक घोषित…..

आकोट- संजय आठवले

अकोला जिल्ह्याच्या ७ तालुक्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य यांची निवडणूक नुकतीच पार पडली असून आता या नवगठीत ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. येत्या ४ जानेवारी २०२३ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ही निवडणूक घेण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षणामुळे सरपंच पदाच्या अनेक दावेदारांना आपल्या भावनांना आवर घालावा लागला आहे.परंतु सत्तेत येण्याकरिता ह्या लोकांनी ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यातील अनेक जण उपसरपंच पदी आरुढ होण्याची महत्त्वाकांक्षा ऊराशी बाळगून आहे. त्याकरिता संपूर्ण जिल्ह्याला उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे वेध लागले होते. ते वेध आता संपुष्टात आले असून अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यांच्या २६६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांची निवडणूक घोषित करण्यात आली आहे.

यामध्ये पातुर तालुक्यातील २७, बाळापुर तालुक्यातील २६, तेल्हारा तालुक्यातील २३, बार्शी टाकळी तालुक्यातील ४६, आकोट तालुक्यातील ३७, अकोला तालुक्यातील ५३ तर मुर्तीजापुर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी निवडणूक होणार आहे. या सर्व ठिकाणी ही निवडणूक शांततेने व कायदेशीर मार्गाने संपन्न होण्याकरिता प्रशासनाकडून निवडणूक निरीक्षक पाठविण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या घोषणेसह त्या निरीक्षकांची नावेही घोषित करण्यात आली आहेत.
मात्र ग्रामपंचायत भौरद तालुका अकोला, गोंधळवाडी तालुका पातुर, परंडा तालुका बार्शीटाकळी व बांबर्डा तालुका आकोट या ४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद रिक्त आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या ह्या प्रथम सभेची अध्यक्षता करण्याकरिता प्रशासनाकडून निवडणूक निरीक्षकांसह अध्यासी अधिकारी पाठविण्यात येणार आहेत.

ही निवडणूक लावण्याच्या घोषणेने अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून उपसरपंच पदाकरिता मोर्चे बांधणीस वेग आला आहे. या धामधुमीत कोण कोण बाजी मारते याकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायती व त्या ठिकाणी नियुक्त निवडणूक निरीक्षकांची यादी पुढीलप्रमाणे…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: