रामटेक – राजु कापसे
रामटेक विधानसभा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी संस्कृत विद्यापीठात दोन दिवसीय निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २२ मार्च रोजी ७२० निवडणूक कर्मचाऱ्याना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. २३ मार्च रोजी देखील दोन सत्रात ७२० कर्मचारी असे एकूण १४४० कर्मचाऱ्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
एसडीओ व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना स्वरंगपते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रमेश कोळपे, अतिरिक्त तहसीलदार शेखर पुनसे, नायब तहसीलदार महेश, कुलदीवार, नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्यासह दीडशे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिले.
मतदानाची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक कर्मचाऱ्यांना समजावून सांगितली. सर्व नमुना फॉर्मची माहिती देण्यात आली. ८ खोल्यांमधे ईव्हीएमचे काम निवडणूक कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या समजावून सांगण्यात आले आणि त्यांना ईव्हीएम हाताळण्यास सांगण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी मतदानापासून वंचित राहु नये म्हणून त्यांना पोस्टल बॅलेट फॉर्म भरण्यास सांगण्यात आले.