Monday, December 30, 2024
Homeराजकीयनिवडणूक निरीक्षक पोहोचले अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी अहेरी येथे मतदान पथकांना...

निवडणूक निरीक्षक पोहोचले अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी अहेरी येथे मतदान पथकांना केले मार्गदर्शन…

गडचिरोली – मिलिंद खोंड

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त सामान्य निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह, निवडणूक खर्च निरीक्षक एस वेणूगोपाल, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी शुक्रवारी सर्वाधिक अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

त्यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील जिल्हा परिषद शाळेत निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. तसेच अहेरी व नागेपल्ली येथील मतदान केंद्रांची पाहणी करून मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शनही केले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिल रोजी गडचिरोली-चिमूर क्षेत्रात मतदान होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे.या निर्वाचन क्षेत्रात एकूण ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून तेलंगाणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांची सीमा लागून असलेल्या तसेच सर्वाधिक अति संवेदनशील अश्या अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपली येथे दाखल झाले.

यावेळी त्यांनी येथील स्ट्रॉंग रूम ईव्हीएम साठवणूक कक्ष तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी केली.तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी उन्हापासून बचावसाठी शेड व इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी सुद्धा मतदान पथकांच्या दुसऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जिवने, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख तसेच अहेरी उपविभागातील सर्व तहसीलदार उपस्थित होते.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: