Election Date : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान
२२ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची तारीख
२९ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख
३० ऑक्टोबर अर्ज छाणणी
४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
२० नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख
२३ नोव्हेंबर रोजी निकाल
Schedule for General Election to Legislative Assembly of #Maharashtra,2024 to be held in a single phase.
— Election Commission of India (@ECISVEEP) October 15, 2024
Details in images👇#MaharashtraAssemblyElections2024 #ECI #Schedule pic.twitter.com/XF4FXebtJR