Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीनिवडणूक प्रचाराला लागले गालबोट...दोन गटांत मारहाण...

निवडणूक प्रचाराला लागले गालबोट…दोन गटांत मारहाण…

रामठी येथील घटना.
जखणीना उपचारासाठी नागपूर येथे हलवले.
गुरवारी रात्री 9.30 वाजताची घटना.
दोन्ही गटाच्या आरोपींवर गुन्हे दाखल.

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यात 22 गावामध्ये ग्राम पंचायत निवडणुका आहे. नरखेड तालुक्यातील रामठी हे गाव नेहमी निवडणुकी काळात चर्चेचा विषय राहतो. त्याच प्रमाणे नेहमी निवडणूक काळात तिथे दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू असतो.

गुरवारी रात्रीच्या सुमारास 9.30 सुमारास रामठी येथील सरकारी विहरीजवळ प्रचार सभासुरू होती सभा सुरू असताना आरोपींनी तिथे बसलेल्या महिलांना शिवीगाळ केली व दीलेश ठाकरे यांच्या घरावर दगड फेक केली त्यामुळे दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली त्यात सुरेश पुरुषोत्तम सहारे वय वर्ष 30, विलास विश्वनाथ चौधरी वय ३४ वर्ष रा. रामठी, राजु सिताराम डोंगरे वय ४८ वर्ष रा. रामठी जखमी झाले.

ADS

त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. यातील आरोपी प्रफुल मुसळे, अक्षय वटाणे, गुलाबराव सहारे सर्व रा. रामटी ता. नरखेड यांच्या विरुद्ध कलम ३२४, १४३, १४७, १४८, ३४ भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे दुसऱ्या गटातील शामकांत हंसराज खवसे विलास विश्वनाथ चौधरी, राजू सिताराम डोंगरे, सुनिल नेतराम खबसे , विजय भाऊराव खवसे, विजय ज्ञानेश्वर बारंगे सर्व रा. रामठी यांच्या विरुद्ध कलम २९४, ३३६, ५०६, १४३, १४७, ३४ भादवी नुसार गुन्हा नोंद केला असून तपास ठाणेदार मनोज चौधरी करीत आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त रामठी येथे लावण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: