Monday, December 23, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदे यांची भेट महागात पडली…माजी मंत्री राजकिशोर यांची पक्षातून हकालपट्टी…

एकनाथ शिंदे यांची भेट महागात पडली…माजी मंत्री राजकिशोर यांची पक्षातून हकालपट्टी…

उत्तरप्रदेशात एकीकडे नागरी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसरीकडे बसपाने आपल्या दोन नेत्यांची हकालपट्टी केली. माजी मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांनी यूपीमध्ये आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे आणि याच गोष्टीमुळे बसपा सुप्रीमो मायावती नाराज झाल्या होत्या.

राजकिशोर हे बस्ती भागातील नावाजलेले नेते आहेत. ते तीन वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द बसपामधूनच सुरू केली. त्यानंतर ते सपामध्ये दाखल झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर डिंपल हेही राजकारणात सक्रिय आहेत. सपा सरकारमध्ये त्यांना ऊर्जा सल्लागारही करण्यात आले होते. नंतर दोघेही काँग्रेसमध्ये गेले.

2020 मध्ये पुन्हा बसपमध्ये प्रवेश केला होता. बस्तीचे बसपाचे जिल्हाध्यक्ष जयहिंद गौतम यांनी पत्र जारी करताना दोघांचीही बसपातून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे. अनुशासनहीन आणि पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येत आल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही नेत्यांनी अयोध्येत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: