रामटेक – राजु कापसे
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसि.स्कूल ख़ैरी परसोडा रामटेक जि. नागपूर, येथील सीबीएसई बोर्डाकडून घेतलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागलेला आहे. यात इयत्ता १० वीचा ७४.४५ टक्के तर इयत्ता बारावीच्या ५८.०६ टक्के असा निकाल लागलेला आहे.
इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक दिशा हेमंत कुमरे (६८.८%) द्वितीय तनवी किशोर आत्राम (६०.४%) तर तृतीय श्रुतिका राधेश्याम उईके(५६.२%) व इयत्ता बारावीत प्रथम वैष्णवी धनराज कोकोडे (६५.६%),द्वितीय रिया कालिदास नन्नावरे (६३.६%),तृतीय करिना माधव मडावी (६३.४%) यांनी क्रमांक पटकावला आहे.
इयत्ता दहावी व बारावीत मराठी व सामाजिक शास्त्र विषयाचा १००% निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवावे यासाठी शाळेत रात्र पर्यवेक्षित अभ्यासिका, विद्यार्थी समूह (गट) चर्चा अभ्यास, तसेच अप्रगत विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देवून नेमून दिलेला अभ्यासक्रम डिसेंबर महिना अखेर पु्र्ण केला, व नियमित सराव परीक्षा घेतल्या याचा सामूहीक परिणाम म्हणून या वर्षी विद्यार्थ्यांना सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश मिळाले असे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती रूपा बोरेकर यांनी सांगितले.
एकलव्य स्कूलचे शिक्षक राधिका गोलटकर, सुजाता अर्जुने,धनश्री दर्णे, विठ्ठल सपकाळ, गजानन धनगर, दिपक हुकरे, चारूलता सहारे,समरिन अंसारी, अविनाश ढवळे,ज्ञानेश्वर सोनटक्के, दिपाली उके यामिनी शेमला व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.