रामटेक – राजू कापसे
मुस्लिम समाजातील एक पवित्र सण – ईद-ए-मिलादुन्नबी रामटेकमध्ये मुस्लिम समाजातर्फे मोठ्या बंधुभावाने आणि उत्साहाने रविवारी साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी हा सण मुस्लिम समाजामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधांमुळे ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्यात आलेली नव्हती. मात्र,यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे निर्बंधमुक्त ईद साजरी करण्यात आली.
सकाळी स्नान करून, नवीन कपडे परिधान करून रामटेक शहराच्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या जामा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांनी प्रेमभावनेची शांतीपूर्ण नमाज अदा केली.नंतर एकमेकांना आलिंगन देऊन व “ईद मुबारक” अशा शुभेच्छा देऊन बंधुभाव व्यक्त केला. ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून जामा मस्जिद पासून रामटेक बस स्टॅन्ड, गांधी चौक, अठराभुजा गणेश मंदिर, शांतिनाथ मंदिर या मार्गाने मिरवणूक काढून तिचे समापन जामा मस्जिद मध्ये करण्यात आले.
तसेच मिरवणूक मार्गातील विविध ठिकाणी समस्त नागरिकांना मिठाई व शरबतचे वाटप करण्यात आले. रामटेक शहरातील विविध जाती आणि धर्मातील ओळखीच्या व्यक्तींना मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे ईदच्या शुभेच्छा दिल्या. रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ईद-ए-मिलादुन्नबीच्या या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मौलाना जुल्फी खाँ अहमद, सुभान शेख, हुसेन भाई मालाधारी, सरदार शेख, फिरोज छव्वारे,सलीम अगवान, अकील कुरेशी, आरिफ मालाधारी, तरबेज कुरेशी, शफि शेख,अकबर छव्वारे, इजाज शेख, सलीम छव्वारे,इसराईल शेख,झकिर कुरेशी, करीम मालाधारी,असलम शेख, आदी. मुस्लीम बांधव उपस्थित होते.