रामटेक – राजु कापसे
दि.२८ सप्टेंबर ला रामटेक शहरात समाजातील एक पवित्र सण – ईद-ए-मिलादुन्नबी रामटेकमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बंधुभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी हा सण मुस्लिम समाजामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
सकाळी स्नान करून, नवीन कपडे परिधान करून रामटेक शहराच्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या जामा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांनी प्रेमभावनेची शांतीपूर्ण नमाज अदा केली.नंतर एकमेकांना आलिंगन देऊन व “ईद मुबारक” अशा शुभेच्छा देऊन बंधुभाव व्यक्त केला.
ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून जामा मस्जिद पासून रामटेक बस स्टॅन्ड, गांधी चौक,अठराभुजा गणेश मंदिर, शांतिनाथ मंदिर या मार्गाने मिरवणूक काढून तिचे समापन जामा मस्जिद मध्ये करण्यात आले. तसेच मिरवणूक मार्गातील विविध ठिकाणी समस्त नागरिकांना मिठाई व शरबतचे वाटप वाटण्यात आले.
रामटेक शहरातील विविध जाती आणि धर्मातील ओळखीच्या व्यक्तींना मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नागपूर जिल्हा ग्रामीन चे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, मौलाना जुल्फी खाँ अहमद, सुभान शेख,सादीकअली कुतुब्बी,नशीर शेख,याकुब मालाधारी, हुसेन भाई मालाधारी, सरदार शेख, फिरोज छव्वारे,
सलीम अगवान, अकील कुरेशी, आरिफ मालाधारी,बाबा मालाधारी, तरबेज कुरेशी, शफि शेख,अकबर छव्वारे, इजाज शेख, सलीम छव्वारे,इसराईल शेख,झकिर कुरेशी, करीम मालाधारी,असलम शेख,अरहान मालाधारी,जिदान मालाधारी आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.