Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीआयशर गाडीची धडक दोन युवकांचा जागीच मृत्यू...

आयशर गाडीची धडक दोन युवकांचा जागीच मृत्यू…

नरखेड – दिनांक नऊ दोन 2024 ला साडेसात ते आठ च्या सुमारास मौजा मोगरा बस स्टॉप समोर सावरगाव ते नरखेड रोडवर मृताक सागर दिगंबर रेवतकर व 21 वर्ष राहणार अंबाडा देशमुख हा त्याची मोटर सायकल बजाज डिस्कवर क्रमांक एम एच 40 E 8846 वर मागे बसून गावातील सौरभ मोरेश्वर मोहाडे व 21 वर्ष राहणार अंबाडा देशमुख,

कुणाल अंतराम नेहारे वय वर्ष 18 राहणार अंबाडा देशमुख असे ट्रिपल सीट ओमकार जिनिंग मिल मोगरा येथे कामावर जात असताना समोरून येणाऱ्या आयशर गाडी क्रमांक एम एच 29 बीई 261 चे चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालून मोटार सायकल ला जबर धडक देऊन अपघात केला सदर अपघात मोसा चालक सागर दिगंबर रेवतकर वय 21 वर्ष राहणार अंबाडा देशमुख व त्याचा मित्र सौरभ मोरेश्वर मोहाडे व 21 वर्ष राहणार अंबाडा देशमुख हे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले असून कुणाल अंतराम नेहारे हा जखमी असून त्याचा उपचार नागपूर येथे सुरू आहे.

या संदर्भात पोलीस स्टेशन नरखेड येथे 59/24 कलम 304 (अ) 337,338 भारतीय दंड विधान, सक 184,134 मोवाका अन्वेय आयशर गाडी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद असून पुढील तपास सह पोलीस निरीक्षक तिवारी साहेब यांचे मार्गदर्शनात पोउपनी गणेश पडवार हे करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: